अंतरवाला येथे गावकऱ्यांनी मुलं चोर असल्याच्या संशयावरून पुस्तक विक्रेत्यांना केली मारहाण
जि.प. शाळेसमोर पुस्तक विक्रीसाठी आलेल्यांना लहान मुलं चोरी करणारी टोळी असाल्याचा गावकऱ्यांचा होता संशय
जालना शहरा लगत असलेल्या अंतरवाला येथे आज दिनांक 18 शुक्रवार रोजी सकाळी साडेअकरा वा. दरम्यान ओमीनी चारचाकी गाडी मधून लहान मुलांना चोरणारी टोळी असल्याचा सशंय आल्याने नागरीकांनी दोन जणांना मारहाण केली.सामनगाव परिसरात जि.प. शाळेसमोर काही अज्ञात व्यक्ती ओमीनी गाडी घेऊन उभे आसल्याचे काही गावकऱ्यांच्या लक्षात आले. संशयावरून नागरीकांनी विचारपूस केली असताना आम्ही पुस्तक विक्रेते असल्याचे सांगीतले परंतू गावकऱ्यांनी त्यांचे काही एक न ऐकता त्यांना मारहाण केली.
याविषयी सविस्तर वृत्त असे की प्रशांत साठे हे जालना शहरातील नूतन वसाहत येथील रहिवासी असून त्यांचा प्रगती नावाची पुस्तक विक्रीची एजन्सी आहे.ते आपल्या सहकाऱ्यासोबत शहरालगत असलेल्या प्रत्येक शाळेसमोर पुस्तक विक्री करत आहेत.यावरून सामानगाव अंतरवाला येथे पुस्तक विक्रीसाठी गेले असताना नागरिकांनी लहान मुलांचे चोर असल्याचे समजून त्यांना मारहाण करून त्यांची ओमीनी गाडीवर दगडफेक करून गाडीची मोठी नुकसान केली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत त्यांना ताब्यात घेऊन तालुका पोलीस ठाणे येथे पाठवले. तसेच त्यांच्याकडून घटना जाणून घेतली पोलिसांनी उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.
यावरून त्यांनी तालुका पोलीसात तक्रार दाखला करणार असल्याचे सांगीतले या प्रकरणातील तालुका पोलीस पुढील तपास करत आहे..