अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद जिल्ह्यातील पाचही विधानसभा लढणार -बाबासाहेब वानखेडे.
जालन्यात उद्या बैठक, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद आता विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. जिल्ह्यातील जालना, परतुर-मंठा, भोकरदन, घनसावंगी मतदार संघात स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहे. तर बदनापुर- अंबड विधानसभा मतदार संघ राखीव असल्यामुळे येथे राखीव उमेदवाराला पाठींबा देणार आहेत. या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर उद्या 20 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 12.30 वाजता नुतनवसाहत अंबड रोड, फ्रेन्डस् कॅपिटल समोर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस ओबीसी समाजातील सर्व पिवळे झेंडे एकत्र यावे हाच उद्देश आहे. ओबीसी समाजातील महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी व ओबीसी , एससी, एसटी, व्हिजीएनटी भटक्या विमुक्त समाजाने बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे, सुरेश रत्नपारखे, देविदास घुले, रंगनाथ चांदणे, कडुबा वाकीकर, महेंद्र शिंदे, शेख अकील, ॲड.अरशद बागवान, ॲड. रामेश्वर खांडेभराड, सचिन वानखेडे, नितीन तायडे यांनी केले आहे.