Mahila Sanvad News in Jalna

तब्बल 4 वर्षे शारीरिक संबंध ठेवून प्रेयसीचा विश्वासघात..प्रेयसी दलित असल्याने लग्नास नकार देणारा प्रियकर जेरबंद. प्रियकराची 3 दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी..

तब्बल 4 वर्षे शारीरिक संबंध ठेवून प्रेयसीचा विश्वासघात..प्रेयसी दलित असल्याने लग्नास नकार देणारा प्रियकर जेरबंद. प्रियकराची 3 दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी..

जालना शहरातील एका खाजगी बाल रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत असलेल्या एका 24 तरुणीचे त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या अमोल जगन्नाथ तांगडे (रा. वझर सराटे, ता. जालना) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते.

त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अमोल तांगडे याने त्या तरुणीवर रुग्णालयात, तसेच ती राहत असलेल्या लक्ष्मीनारायणपुरा भागातील खोलीत आणि स्वतःच्या खोलीमध्ये बोलावून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवलेले आहेत._

सदर तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता, तू माझ्या जातीची नाहीस, मागासवर्गीय आहेस, असे म्हणून त्याने तिच्यासोबत लग्नाला नकार दिला होता._

त्यांनतर तो स्वतःचा मोबाईल बंद करून, जालना शहरातून गायब झाला होता.

दरम्यान, सदर तरुणीने आपल्या आई-वडीलासह काल रात्री कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *