घनसावंगी मतदारसंघात आदर्शआचारसंहितेची अंमलबजावणी करावी
जालना,(जिमाका) दि. 22 :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणूकीचा कार्यकम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित झाला असून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तरी 100 घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणावरील विविध बाबीचे विरुपण करुन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. अशी सुचना तहसीलदार तथा 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार सर्व ठिकाणची वाहने, भिंती, नामफलक उदघाटन शिला किंवा राजकीय प्रचार, भिंतीपत्रक, बॅनर्स, फ्लेक्स, कट आऊटस, डिजीटल आदि काढण्याची कार्यवाही आदर्श आचारसंहिता लागु झाल्यापासून पहिल्या 24 तासात, 48 तासात आणि 72 तासात करणे अनिवार्य आहे. तरी निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार संबंधित अधिकारी, विभाग, संबंधित यंत्रणेला आदेशित करावे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.