विधानसभा मतदार संघासाठी 2 उमेदवारांचे 3 अर्ज दाखलआजपर्यंत 158 उमेदवारांना 403 नामनिर्देशन अर्जाचे वितरण
जालना, दि.22 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज 2 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. आजपर्यंत एकुण 2 उमेदवारांचे 3 नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
99-परतूर, 102- बदनापूर आणि 103-भोकरदन या तीन विधानसभा मतदार संघासाठी आज कोणीही अर्ज दाखल केला नाही. मंगळवार दि. 22 ऑक्टोबर, 2024 रोजी 100-घनसावंगी मतदारसंघासाठी चोथे शिवाजीराव कुंडलिकराव (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी दोन तर 101-जालना विधानसभा मतदारसंघासाठी मिलिंद बालु बोर्डे (अपक्ष) यांनी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. याप्रमाणे चोथे शिवाजीराव कुंडलिकराव (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि मिलिंद बालू बोर्डे (अपक्ष) याप्रमाणे आज दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
आजच एकूण 158 इच्छुक उमेदवारांना 403 नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. उमेदवारांना मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 यावेळेत आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. बुधवार, दि. 30 ऑक्टोबर, 2024 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 4 नोव्हेंबर, 2024 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. तर बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल शनिवार दि. 23 नोव्हेंबर, 2024 रोजी जाहिर केला जाणार आहे.