अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी जेरबंद…
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई…
भोकरदन तालुक्यातील डावरगावात येथे 2 किलोमीटर पर्यंत पाठलाग करून आरोपीस घेतले ताब्यात…
जालन्याच्या अवैध गर्भपात प्रकरणातील फरार आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. भोकरदन तालुक्यातील डावरगावात येथे 2 किलोमीटर पर्यंत पाठलाग करून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रामसिंग उदयसिंग बडिये (३४), रा. कुंभारी, ता. भोकरदन असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता 24 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलीय. भोकरदन येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर आरोग्य विभाग व पोलिसांनी ७ जुलै रोजी छापा टाकून पर्दाफाश केला होता. या प्रकरणात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांपैकी मुख्य सूत्रधार दिलीपसिंग राजपूत यांच्यासह आठजणांना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखीन काही फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती आज दिनांक 23 बुधवार रोजी 12:00 वयाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभाग्य पोलीस अधिकारी आनंत कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव,
उपनिरीक्षक योगेश उबाळे, पोहेका प्रशांत लोखंडे, विजय डिक्कर पो कॉ धिरज भोसले, सोपान क्षीरसागर यांनी केली..