माळीपुरा येथे धारदार तलवार बाळगणारा एक जण जेरबंद..
जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
आरोपीच्या ताब्यातून 1 धारदार तलवार जप्त..
जालना शहरातील: धारदार तलवार बाळगणाऱ्या एकास जालना स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलय. जुना जालना भागातील माळीपुरा येथे एक इसम स्वतः जवळ तलवार बाळगून असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 22 मंगळवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास माळीपुरा भागात छापा टाकून बाबा इब्राहिम खान यास ताब्यात घेतलय. आरोपीच्या घराची झडती पोलिसांनी घेतली असता त्याच्या घरातून 1 धारदार तलवार जप्त करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 23 बुधवार रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, पंकज जाधव,
यांनी दिली.
दिनांक 22/10/2024 रोजी अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या इसमांबाबत महिती घेत असतांना गुप्तबातमीदाराने माहिती दिली की, ईसम नामे अशरफ ऊर्फ बाबा ईब्राहिम खान, वय 42 वर्षे, रा.माळीपुरा, जुना जालना हा माळीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये तलवार घेवुन फिरत असुन लोकांमध्ये दहशत पसरवित आहे. मिळाल्या माहितीवरुन त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचा ताब्यातुन रु. 2000/- रु. किंमतीची धारदार तलवार जप्त करण्यात आली असुन पोहेकाँ आडेप यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे कदिम जालना येथे गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्य मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश ऊबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोहेकों सॅमुअल कांबळे, लक्षमीकांत आडेप, रमेश राठोड, सुधीर वाघमारे, सतिष श्रीवास, कैलास चेके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे.