बेकायदेशीरित्या अग्नीशस्त्रे बाळगणारा आरोपी केला जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा जालना ची कारवाई.जालना जिल्हयामध्ये अवैध अगिशस्त्र बाळगणात्या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा जालना चे पो.नि.श्री.पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांनी पथक तयार करुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले होते.
दिनांक 26/10/2024 रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाबाबत माहिती घेत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, इसम नामे गजानन बाळु राठोड, वय-25 वर्ष, व्यवसाय-मजुरी, रा.रुई श्रीराम तांडा, ता. अंबड जि. जालना हा अवैधरित्या भरमार (अगिशस्त्र) बाळगुन आहे. त्यानुसार इसम नामे गजानन राठोड याचा शोध घेत असतांना तो त्याच्या श्रीराम तांडा, अंबड जि. जालना येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याकडे तो बाळगुन असलेल्या भरमार (अगिशस्त्र) बाबत चौकशी केली असता त्याने भरमार (अगिशस्त्र) काढुन दिल्याने पोस्टे तीर्थपुरी, जालना येथे भारतीय हत्यार कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/श्री. पंकज जाधव, सपोनि श्री. साजिद अहमद, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार/ लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, देविदास भोजने, आक्रूर धांडगे, भागवत खरात, कैलास चेके, नारायण माळी यांनी केली आहे.