Mahila Sanvad News in Jalna

जालना जिल्हा विधानसभा मतदार संघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन

जालना जिल्हा विधानसभा मतदार संघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन

जालना जिल्हा विधानसभा मतदार संघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन

जालना, दि. 30, (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्हा प्रशासन विधानसभेची निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेले असून त्याच अनुषंगाने माध्यम कक्षामार्फत जालना जिल्ह्यातील पाच मतदारसंघाची सन 1980 ते 2019 पर्यंतची पूर्वपीठिका- माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात मान्यवरांच्या हस्ते बुधवार दि.30 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडले.

यावेळी निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र, निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. नवीन, निवडणूक निरीक्षक (पोलिस) झेड ॲनी विजया, निवडणूक निरीक्षक (खर्च) देव प्रकाश बमणावत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, बीएसएफचे अजयकुमार आणि जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष नोडल अधिकारी अरुण सुर्यवंशी आदी प्रमुख उपस्थित होते.

जालना जिल्हा विधानसभा मतदार संघ पूर्वपीठिका-माहिती पुस्तिकेचे कौतुक करत ही पुस्तिका सर्व प्रसार माध्यमे, अभ्यासकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचे सुतोवाच मान्यवरांनी काढले. पूर्वपिठीकेमध्ये निवडणूक आचारसंहिता, पेड न्यूजचे निकष, सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, महाराष्ट्र राज्य निवडणूक कार्यक्रम, विधानसभा मतदार संघ निवडणूक कार्यक्रम, निवडणूक निरिक्षक, भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जालना जिल्ह्यातील जिल्हास्तरीय विभागप्रमुख, सर्व विधानसभा मतदार संघातील प्रमुख संपर्क अधिकारी, कक्ष प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच मतदार संख्या, मतदान केंद्र, ईव्हीएम/व्हिव्हिपॅट आणि सन 1980 ते सन 2019 पर्यंत जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात पार पडलेल्या निवडणूकांची सविस्तर माहिती संकलीत करण्यात आलेली आहे. या पूर्वपिठीकेसाठी एम.ई. तुपसमिंद्रे, प्रा. सुनिल इंदूरकर, श्री. बदनापूरकर, पुष्पा धनाईत, प्रतिभा इंगळे यांच्यासह आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *