जालना जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल साहेब यांनी सुचना दिल्या होत्या. त्यावरुन श्री. सिध्दार्थ बारवाल, भा.पो.से. यांचेसह, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले. दिनांक 03/11/2024 रोजी जालना शहरामध्ये अवैध धंदयांचा शोध घेत असतांना इसम नामे सुरेंद्र भगवान जाधव, वय-32 वर्ष, रा. कैकाडी मोहल्ला, जुना जालना हा कैकाडी मोहल्ला येथे गावठी हातभट्टी चालवुन दारु विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने कैकाडी मोहल्ला, जुना जालना येथे जावुन कारवाई केली व गावठी हातभट्टया, त्यासाठी वापरात येणारे रसायन, गावठी दारु व गावठी हातभटटी तयार करण्यासाठी वापरात
येणारे रु.1,16,500/- किंमतीचे साहित्य नष्ट करुन कदीम जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात
आला.
तसेच इसम नामे राजेंद्र गोपाल पारनेरकर, वय-31 वर्ष, रा. डबलजीन, जुना जालना हा कैकाडी मोहल्ला येथे गावठी हातभट्टी चालवुन दारु विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यावरही कारवाई करुन गावठी हातभट्टया, त्यासाठी वापरात येणारे रसायन, गावठी दारु व गावठी हातभटटी तयार करण्यासाठी वापरात येणारे रु.1,67,500/- किंमतीचे साहित्य नष्ट करुन कदीम जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सिध्दार्थ बारवाल, भा.पो.से., स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, पोउपनि. श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, भाऊराव गायके, सुधीर वाघमारे, चंद्रकला शडमल्लु, इरशाद पटेल, रमेश काळे, संजय सोनवणे, सर्व स्थागुशा यांनी केली आहे.