Mahila Sanvad News in Jalna

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 109 उमेदवारनिवडणुकीच्या रिंगणात ; 119 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 109 उमेदवारनिवडणुकीच्या रिंगणात 119 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

जालना,दि.4 (जिमाका):  विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी आज सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024  रोजी नामनिर्देश मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. छाननी प्रक्रियेनंतर मतदारसंघात एकुण 228 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 119 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता जालना जिह्यातील 99-परतूर विधानसभा मतदार संघातील 11, 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघातील 23, 101-जालना विधानसभा मतदार संघातील 26, 102-बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील 17 आणि 103- भोकरदन विधानसभा मतदार संघातील 32 असे पाच विधानसभा मतदारसंघात 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती दिली आहे.

पाच विधानसभा मतदार संघातील 109 उमेदवारांची माहिती

100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, पक्ष आणि चिन्हाची माहिती पुढीलप्रमाणे उढाण हिकमत बळीराम-शिवसेना-धनुष्यबाण, जायभाये दिनकर बाबुराव –बहुजन समाज पार्टी- हत्ती, राजेशभैय्या टोपे- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार- तुतारी वाजवणारा माणूस, कावेरी बळीराम खटके-वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर, बाबासाहेब संतुकराव शेळके-समता पार्टी-ट्रम्पेट, रमेश मारोतराव वाघ- राष्ट्रीय समाज पक्ष-अंगठी, विलास महादेव वाघमारे-ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक-सिंह, शाम कचरु साळवे-बहुजन भारत पार्टी-शिट्टी, आप्पा आन्ना झाकणे-अपक्ष-संगणक, उगले गजानन रामनाथ-अपक्ष-शिमला मिर्ची, उढण सतिश गणपतराव-अपक्ष-ऊस शेतकरी, घाटगे सतिश जगन्नाथराव-अपक्ष-प्रेशर कुकर, चोथे शिवाजी कुंडलीकराव-अपक्ष-किटली, दिनकर उघडे-अपक्ष-डिझेल पंप, निसार पटेल-अपक्ष-शिवणयंत्र, पवार ज्ञानेश्वर प्रतापराव-अपक्ष-कपाट, बाबासाहेब पाटील शिंदे-अपक्ष- फलंदाज,  ॲड भास्कर बन्सी मगरे-अपक्ष-नागरीक, राजेंद्र बबनराव कुरणकर-अपक्ष-ट्रक, रामदास आश्रुबा तौर-अपक्ष-ग्रामोफोन, विलास आसाराम कोल्हे-अपक्ष-ऑटो रिक्षा, श्रीहरी यादवराव जगताप-अपक्ष-विजेचा खांब, सतिश मधूकर घाडगे-अपक्ष- रोड रोलर अशी आहे.

101-जालना विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे नाव, पक्षाचे नाव, चिन्ह पुढीलप्रमाणे अर्जुन पंडीतराव खोतकर  –     शिवसेना –       धनुष्यबाण, किशोर यादव बोरुडे – बहुजन समाज पार्टी – हत्ती , कैलास किसनराव गोरंटयाल- इंडियन नॅशनल काँग्रेस – हात, असद उल्ला शेख अमान उल्ला शहा- सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया-ॲटो रिक्षा, डेव्हीड प्रल्हादराव घुमारे-वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर,निला गौतम काकडे-विकास इंडिया पार्टी-शिवण यंत्र, मिलींद बालू बोर्डे –बहुजन रिपब्लीकन सोशलीस्ट पार्टी –बॅट, ॲड. योगेश दत्तु गुल्लापेल्ली- ऑल इंडिया फॅारवर्ड ब्लॉक-सिंह, विकास छगन लहाने-पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डे.)-प्रेशर कुकर, विजय पंडितराव वाढेकर –संभाजी ब्रिगेड पार्टी-शिट्टी,विनोद राजाभाऊ मावकर – राष्ट्रीय समाज पक्ष-सफरचंद, अनवर कुरेशी सलीम कुरेशी –अपक्ष-स्पॅनर, अनिस शमशोद्यीन सय्य्द – अपक्ष- टीव्ही रिमोट, अफसर फरीद शेख चौधरी- अपक्ष- इस्त्री, अब्दुल हफीज अब्दुल गफार-अपक्ष-पेनाची निब सात किरणांसह, अर्जुन दादापाटील भांदरगे-अपक्ष-हातगाडी, अर्जुन सुभाष कणिसे- अपक्ष-कॅमेरा, अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर-अपक्ष-कपाट, आनंदा लिंबाजी ठोबरे-अपक्ष-ट्रक, कुंडलिक विठ्ठल वखारे- अपक्ष-दुरदर्शन, गणेश दादाराव कावळे-अपक्ष-बादली, योगेश सखाराम कदम-अपक्ष-टीलर, रतन आसाराम लांडगे-अपक्ष-झोपाळा,विशाल लक्ष्मण हिवाळे – अपक्ष-गॅस शेगडी, सपना विनोद सुरडकर-अपक्ष-वाळुचे घडयाळ, ॲड. संजय रघुनाथ रौंदळे-अपक्ष-जातं याप्रमाणे आहेत.

102-बदनापुर विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे नाव, पक्षाचे नाव, चिन्ह पुढीलप्रमाणे कुचे नारायण तिलकचंद –भारतीय जनता पार्टी-कमळ, बबलु नेहरुलाल चौधरी-नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार –तुतारी वाजवणार माणुस,अन्ना साईनाथ चिन्नादोरे- स्वाभिमानी पक्ष-शिट्टी, आदमाने दिनेश दत्तात्रय-रिपब्लिकन सेना-ऑटो रिक्शा,कटके जयश्री संजय-महाराष्ट्र स्वराज्य पार्टी-पेनाची निब सात किरणांसह, नाडे ज्ञानेश्वर दगडुजी-ऑल इंडिया फारवर्ड ब्लॉक-सिंह,शैलेद्र सुदाम मिसाळ- पिपल्स पार्टी ऑफ इंडीया (डेमोक्रेटीक)-ट्रम्पेट, सतिश शंकरराव खरात-वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर, संदीप आसाराम गवळी- समता पार्टी- लिफाफा,काकासाहेब बाबुराव भालेराव-अपक्ष-ग्रामोफोन, गायकवाड संगिता अंकुश-अपक्ष-शिवण यंत्र, चाबुकस्वार राहुल निरंजन-अपक्ष-नागरीक,बाबासाहेब हरिभाऊ खरात –अपक्ष-एअर कंडिशनर, राजेश ओंकारराव राऊत –अपक्ष-प्रेशर कुकर, सचिन विलकिसन कांबळे- अपक्ष-कपाट, सौ. सुश्मिता सुभाष डिघे-अपक्ष-किटली, ॲड.संतोष काशिनाथ मिमरोट-अपक्ष-स्पॅनर याप्रमाणे आहेत.

99-परतूर विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे नाव,पक्षाचे नाव, चिन्ह पुढीलप्रमाणे  अहेमद महमद शेख – बहुजन समाज पार्टी – हत्ती,आसाराम जिजाभाऊ बोराडे (ए.जे.पाटील )- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे )- मशाल,बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)- भारतीय जनता पार्टी- कमळ ,आसाराम सखाराम राठोड- पिपल्स पार्टी ऑफ इंडीया (डे.)-  फळाची टोकरी,कृष्णा त्रिबंकराव पवार- ऑल इंडीया हिंदुस्थान काँग्रेस पार्टी- ट्रम्पेट ,जाधव श्रीराम बन्सीलाल – जय सेवालाल बहुजन विकास पार्टी-प्रेशर कुकर,रामप्रसाद किसनराव थोरात- वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर,अग्रवाल मोहनकुमार हरिप्रसाद-अपक्ष-किटली,अजहर युनुस शेख -अपक्ष -शिट्टी,जेथलिया सुरेशकुमार कन्हैयालाल – अपक्ष –  दुरदर्शन,नामदेव हरदास चव्हाण-  अपक्ष -ॲटो रिक्शा या प्रमाणे आहेत.

भोकरदन विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे नाव,पक्षाचे नाव, चिन्ह पुढीलप्रमाणे  चंद्रकांत पुंडलीकराव दानवे-  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)-तुतारी वाजवणारा माणुस-,दानवे संतोष रावसाहेब- भारतीय जनता पार्टी- कमळ,राहुल जांलिदर छडीदार-बहुजन समाज पार्टी-हत्ती,ॲड.साहेबराव माधवराव पंडीत-हिंदुस्तान जनता पार्टी-बॅटरी टॉर्च,मयुर  रमेशराव बोर्डे-स्वाभिमानी पक्ष – शिट्टी ,दिपक भिमराव बो-हाडे-वंचित भहुजन आघाडी -गॅस सिलेंडर,दिगंबर बापुराव क-हाळे-भारतिय विर किसान पार्टी-गन्ना किसान,विकास विजय जाधव-महाराष्ट्र स्वराज्य पार्टी-पेन निब सात किरणांसह,ॲड.शिरसाठ फकीरा हरी-पिपल्स पार्टी ऑफ इंडीया(डे.)-प्रेशर कुकर,गजानन सिताराम बर्डे-भारतिय आदिवासी पार्टी-ॲटो रिक्शा,अजंली संधु भुमे-ऑल इंडीया फॉरवर्ड ब्लॉक-सिंह, सुनिल लक्ष्मणराव वाकेकर विदूथलाई ‍विरुथलाईगल सथची-पॉट, सुनिल गिनाजी इंगळे-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डे)- बॅट, रवी ‍विजयकुमार हिवाळे-अपक्ष-बलून,  कडूबा म्हातारबा इंगळे- अपक्ष-केटल, यासीन सलिम मदार-अपक्ष-ॲपल, केशव रामकिशन देठे-अपक्ष-रोड रोलर, केशव आनंदराव जंजाळ- अपक्ष-शिलाई मशीन, योगेश पाटील शिंदे- अपक्ष-स्पॅनर, वैशाली सुरेश दाभाडे –अपक्ष-ट्रम्पेट, महादू लक्ष्मण सुरडकर-अपक्ष-हॉकी आणि चेंडू, कैलास रा मदास पैजणे-अपक्ष-बॅटसमन, गणेश रतन साबळे-एअर कंडिशनर, नासेर दौद शेख –अपक्ष-अलमीरा,     रफीक अब्बास  शेख –अपक्ष-बेबी वॉकर, चंद्रशेखर उत्तमराव दानवे-अपक्ष-कॅरम बोर्ड, अकबर अली अकराम अली खान- अपक्ष-बकेट, जगन तुकाराम लोखंडे- अपक्ष- बिस्कूट,शिवाजी आत्माराम भिसे-अपक्ष-टेबल,निलेश बलीराम लाथे-अपक्ष-आयरन,जगदीश दिलीप राऊत-अपक्ष-टेलीविजन,दिवाकर कुंडलिक गायकवाड- अपक्ष-कोकोनट फार्म  याप्रमाणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *