ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातील नेते तथा घनसावंगी मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रमेश वाघ निवडणुक मैदानात राजेश टोपे यांना निवडणुकीत आव्हान देणार
कोणत्याही एका जातीच्या मुद्यावर राजकारणात निवडणुका लढवीता आणि जिंकता येणार नाही, ही बाब लक्षात आल्यामुळे आता मनोज जरांगे यांना रिटर्न गियर टाकावा लागल्याचा टोला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातील नेते तथा घनसावंगी मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रमेश वाघ यांनी लगावला.
ते रविवारी जालना शहरात पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, जरांगे यांना आता इतर जातींचे महत्व निवडणुकीच्या निमित्ताने कळले आहे. त्यामुळेच ते मराठेतर समाजाच्या मतांची समीकरणे जुळवत आहेत. निवडणुकीत आपण मैदानात उतरलो असून राजेश टोपे यांना निवडणुकीत आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी आमदार टोपे यांच्यावर अनेक आरोप केले.