Mahila Sanvad News in Jalna

मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा शेती करणाऱ्यास घेतले ताब्यातस्थानिक गुन्हे शाखा व मौजपुरी पोलीसांची कारवाई

मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा शेती करणाऱ्यास घेतले ताब्यातस्थानिक गुन्हे शाखा व मौजपुरी पोलीसांची कारवाई


जालना जिल्हयात अवैध गांजा विक्री करणा-यावर कारवाई करण्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा विक्री करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

त्यानुषंगाने दिनांक 04/11/2024 रोजी गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती मिळाली की, मौजे बाजी उम्रद शिवारामधील शेतामध्ये इसम नामे बद्री पवार, रा. बाजी उम्रद, ता. जि. जालना हा त्याचे शेतामध्ये मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गांजाची शेती करुन स्वत चे आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करत आहे.
मिळाले बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना व मौजपुरी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मौजे बाजी उम्रद, ता.जि. जालना येथे इसम नामे बद्री पवार याचे शेतावर छापा मारुन त्याच्या गट क्र.433, बाजी उम्रद शिवारामधील शेतामध्ये पाहणी केली असता इसम नामे बद्री पवार हा त्याचे स्वत:च्या मालकीच्या शेतामध्ये गांजाचे एकूण 30 झाडांची लागवड करून संवर्धन व जोपासना करीत असतांना मिळून आला. त्यामुळे सदर गांजाची 30 झाडांचे पंचासमक्ष वजन केले असता ते 80 किलो 415 प्रेम असुन किमत अंदाजे रु.20,10,375/- असल्याचे दिसून आल्याने ते तपासकामी जप्त करण्यात आला असुन इसम नामे बद्री लक्ष्मण पवार, वय-50 वर्ष, रा.बाजीउम्रद, ता.जि. जालना याचेविरुध्द पोलीस ठाणे मौजपुरी, जालना येथे एन. डी. पी. एस. कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंनसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, परतूर श्री. दादहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, मौजपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, स्था. गु.शाचे अधिकारी सपोनि योगेश उबाळे, पोउपनि, राजेंद्र वाघ, संजय राऊत व सोबत स्थागुशाचे अर्मलदार, रामप्रसाद पकरे, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, दत्ता वापुंडे, सतिश श्रीवास, इंरशाद पटेल, आकुर धांडगे, गणेश वाघ तसेच मौजपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार संजय राऊत, यावा हरणे, पंकज बाजड, नितीन खरात, अविनाश मांटे, प्रशांत म्हस्के, प्रदीप पाचरणे, धोंडीराम वाघमारे इत्यादींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *