अवैध दोन धारदार तलवार बाळगणा-या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना जिल्हयात अवैध धारदार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजय बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना व पथकास सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन श्री. पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 04/11/2024 रोजी पोलीस ठाणे अंबड हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना माहिती मिळाली होती की, ईसम नामे घनशाम अंकुश मोरे वय 26 वर्षे, रा. कासारवाडी ता. अंबड जि. जालना हा त्याचे राहते घरी स्वतःचे ताब्यात अवैध रित्या 02 धारदार तलवार बाळगुन आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ईसमांचा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी कासारवाडी येथे मिळुन आल्याने त्याचे राहत्या घराबाहेर भिंतीलगत तुराट्यामध्ये लपवून ठेवलेल्या अवैध 02 धारधार तलवारी मिळुन आल्या आहे. नमुद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे अंबड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, देविदास भोजणे, सागर बावस्कर, दत्ता वाघुंडे, भागवत खरात, कैलास चेके सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.