Mahila Sanvad News in Jalna

कन्हैयानगर चेकपोस्टवर पोलीसांनी वाहनात पकडली 14 लाखाची रोख रक्कम

कन्हैयानगर चेकपोस्टवर पोलीसांनी वाहनात पकडली 14 लाखाची रोख रक्कम

कन्हैयानगर चेकपोस्टवर पोलीसांनी वाहनात पकडली 14 लाखाची रोख रक्कम

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले असून शहरातील चोही बाजूने नाकाबंदी करण्यात येत आहे.

आज दि.05 मंगळवार रोजी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी माध्यमांशी संवाद साधत रोख रक्कम जप्ती बाबत माहीती दिली. दिनांक 4 सोमवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कन्हैयानगर येथे नाकाबंदीकरीता असताना व गाड्या चेक करीत असताना गाडी क्र. MH.21 V 9290 ईनव्हा ही गाडी पोलीसांनी चेक केली असता गाडी मध्ये बसलेले गौतम जैन यांना गाडी चेक करण्याबाबत सांगुण त्याची गाडी चेक केली असता वाहनामध्ये पाठीमागील डीकीत पैसे बंडल असलेली थैली आढळून आली. त्यामध्ये 14 लाख 15 हजार तीनशे रु. रोख रक्कम आढळून आल्याने पोलीसांनी SST पथक प्रमुख S.D सपकाळ यांना फोन करुन बोलवुन घेतले सदर चे पैसे पोलिस ठाणे चंदनझीरा येथे जप्त करण्यात आले.

रोख रकमे बाबत विचारपूस केली असता सदरील रक्कम व्यवसायाची असल्याचे गौतम जैन यांनी सांगीतले. सदरील रकमेचे बिल किंवा पावत्या आणण्यास पोलीसांनी साःगीतले असता दुसदिवशी एक वा. पर्यंत त्यांनी बिल किंवा पावत्या जमा केल्या नसल्याचे पो.निरि. सम्राटसिंग राजपूत यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *