Mahila Sanvad News in Jalna

घुगे परिवाराने प्रारंभीपासूनच आपल्यावर भरभरुन प्रेम केले-अर्जुनराव खोतकर

घुगे परिवाराने प्रारंभीपासूनच आपल्यावर भरभरुन प्रेम केले-अर्जुनराव खोतकर
घुगे परिवाराने प्रारंभीपासूनच आपल्यावर भरभरुन प्रेम केले-अर्जुनराव खोतकर

जालना । प्रतिनिधी – रक्ताचे नाते असतेच परंतू त्याही पेक्षा खरे नाते जपण्याचे काम कुणी केले असेल तर ते घुगे परिवाराने केले आहे, असे प्रतिपादन अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी केले.
श्री. खोतकर हे भाऊसाहेब घुगे यांनी आयोजित केलेल्या दिपावली आणि पाडव्यानिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरंगे, शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले, मेघा चौधरी, सत्ंसंग मुंडे, संतोषराव मोहिते,  उद्योजक दिपक अंभोरे, बाजार समितीचे संचालक राकेश पवार, राहुल हिवराळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार केल्यानंतर कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. पुढे बोलतांना श्री. खोतकर म्हणाले की, दिपावली- पाडव्यानिमित्त आपल्याला काही संकल्प करायचे असातात. यानिमित्त मीही आपणा सर्वांना शुभेच्छा देतो, सुयश चिंतीतो! एक गोष्ट खरी की, आपला भारत- हिंदुस्थान हा  विविधतेने नटलेला आहे. या विविधतेतूनच एकता ही निर्माण होते. दिपावली- पाडव्याचेही तसेच आहे, असे सांगून ेते म्हणाले की, मला तुम्ही आई म्हणून आपल्या समस्या सांगा, अडचणी सांगत जा! त्या सोडविण्याचा मी प्रयत्न करील. शेवटी आपण कोणावर रुसतो? फुगतो? आपल्याच माणसावर, आईवर आपण रुसतो, रागावतो, चिंडतो! आणि रुसणार नाही तर काय! एखाद्याचे काम झाले नाही तर आपल्याला राग येणे सहाजिक आहे, हे मी पण समजू शकतो, म्हणूनच मी नेहमी म्हणतो की, आई मुलासाठी एवढी सुखवेडी असते. खरे तर त्या मुलाला पडल्यानंतर उचलण्यासाठी असते. तर कधी गोड कौतुक करण्यासाठी असते. मला सुध्दा याच भुमिकेत राहयाला आवडेल. मला कल्पना आहे की, आपल्या संकट काळात नेहमीच आम्ही धावून येतो, असे नाही. परंतू नेहमीच मला असेच प्रेम द्या! खारीचा वाटा म्हणून देत चला. खरे तर भाऊसाहेब घुगे हा माझा अलिकडचा कार्यकर्ता परंतू या परीवाने जे प्रेम दिले, ते अनमोल आहे. त्याचे वडील, काका माझे चांगले मित्र होते, जे दिले त्यात खुश राहणारा हा कार्यकर्ता आहे. भाऊसाहेब बद्दल मला प्रसंग आठवतो. सकाळी पावणे आठ वाजता हा कार्यकर्ता माझं मैदान गाजवतो आहे. मी तेथे नसलो तरीही माझा कार्यकर्ता मात्र तेथे आहे, म्हणून मलाही कधी ना कधी तरी तेथे जावे लागते. परंतू तुम्हाला कधीतरी जरा जरी खाली-वर झाले की, तुमची आग तळपायाची मस्तकाला जाते, असे सांगून ते म्हणाले की, क्षमा विरस्य भूषणम्, ही जैन समाजाची शिकवण किमान आपल्या पक्षात तरी राबवायला हरकत नाही, असेही श्री. खोतकर शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *