आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की पुण्यातून पहिल्यांदाच महिलांनी महिलांसाठी सुरू केलेले
“महिला संवाद वर्तमानपत्र” आता पुण्यातून आपल्या सेवेत सक्रिय……
महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी, महिलांचे विश्व फुलविण्यासाठी आणि महिलांच्या समग्र विकासासाठी सुरू करण्यात आलेले पाहिले साप्ताहिक/दैनिक ‘महिला संवाद’ महिलांना त्यांच्या भावना, संकल्पना, विचार निर्भीडपणे मांडता यावे असे मुक्त विचारपीठ उपलब्ध देत आहे.
दर गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या ‘महिला संवाद’ या स्वतंत्र वृत्तपत्रात महिलांना त्यांचे राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, राष्ट्रीय,साहित्यिक,व्यवसायिक, औद्योगिक, आंतरराष्ट्रीय इत्यादी विषयांबाबतचे विचार, मते किंवा संकल्पना स्पष्टपणे मांडता याव्यात, यासाठी ‘महिला संवाद’ने एक आश्वासक पाऊल उचलले आहे. समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रातील महिलांना त्यांचे प्रश्न येथे मांडता येतील. या प्रश्नांची उकल करणाऱ्या महिलांच्या संकल्पना देखील येथेच महिलांना मिळतील, याची तजवीज ‘महिला संवाद’ मध्ये करता येणार आहे.
तेव्हा महिलांना आपले मते व्यक्त करण्यासाठी ‘महिला संवाद’ च्या वतीने महिलांना लिहिते होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. आपल्याला वाटेल त्या विषयावर बिनधास्तपणे लिखाण महिलांनी करावे. आम्ही त्या दर्जेदार लिखाणाला ‘महिला संवाद’ मधून प्रसिद्धी देण्यात येईल.
व्हॉटसअप लिंक जॉईन करा नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी आजच सभासद व्हा….मिळवा आकर्षक बक्षिसे…..
एका क्लिकवर बातमी वाचा इ पोर्टल ई पेपर वर उपलब्ध