अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची आज जालन्यात जाहीर सभा
जालना विधानसभेचे एकच लक्ष, हवे फक्त अर्जुनभाऊ खोतकर!
जालना : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्षाचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार अर्जुन पंडितराव खोतकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जाहीर सभा उद्या म्हणजे सोमवारी 4.30 वाजता आझाद मैदान, जालना येथे होणार आहे, या सभेस महायुतील पदाधिकार्यांसह मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जालना विधानसभा मतदार संघातील पीर कल्याण येथे अर्जुन खोतकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. श्री. खोतकर यांनी पीर कल्याण, बाजी उम्रद, कडवंची, धार येथेही भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.यावेळी श्री. खोतकर यांच्या समवेत श्री. पंडीतराव भुतेकर, भाऊसाहेब घुगे, संतोषराव मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पीरकल्याण गावातील लोकांना आपल्या हक्काचा आणि अधिकाराचा व्यक्ती असल्यानें लोकांच्या चेहर्यावर आनंद व्यक्त होताना दिसत होता. यावेळी पीरकल्याण गावातील सर्व महापुरुषाच्या चरणी अभिवादन करून श्री. खोतकर यांनी लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.
याप्रसंगी चर्चा करताना श्री. खोतकर यांनी जालना विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता गेल्या अडीच वर्षात 300 ते 400 कोटी रुपयांचा निधी आणून शहर असेल किंवा ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. जालना विधानसभा मतदारसंघाचा भूमिपुत्र म्हणून मी नेहमीच आपल्या सेवेत रुजू आहे व कुठल्याही अडीअडचणी, सुख- दुःखात मी तुमच्या पाठीमागे तत्पर उभा असल्याचं मत यावेळी श्री. खोतकर यांनी व्यक्त करुन आपली ऊमेदवारी अनेकांना खटकू लागली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आम्ही केवळ टक्केवारीवर लक्ष देत नाही तर कामावर लक्ष असते. एकीकडे काम करणारा माणूस तर दुसरीकडे टक्केवारी घेऊन काम वार्यावर सोडणारा आमदार, अशी अवस्था या मतदार संघाची आहे. म्हणूनच याच मतदार संघातील अनेक जण म्हणतात की, जालना विधानसभेचे एकच लक्ष, हवे फक्त अर्जुनभाऊ खोतकर!
याप्रसंगी शिवसेना युवासेना, शिवसैनिक, तसेच भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जेष्ठ मंडळी, महिला भगिनी, ग्रामस्थ, युवा पिढी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.