संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर यांच्या संयुक्त मतदार जनजागृती अभियान
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार कल्याण केंद्र परिसर तसेच दळवी नगर परिसरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.
यावेळी मतदान करण्याची सर्वांनी शपथ घेतली या अभियानात
आन बाण शान से सरकार बने मतदान से
लोकशाहीची एकच शान पवित्र कार्य मतदान
कायको लगाऊ गालबोट लोकशाही को करेंगे वोट
मत आहे आपला अधिकार त्याला देऊ नका नका
अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष श्री राजन लाखे सर संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योग नगरचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे एच आर ऑफिसर प्रगती पांडे,चंद्रकांत झगडे सेवानिवृत्त शिक्षक संघटना पिंपरी चिंचवड शहर, आनंद पाथरे प्रिया पुजारी सुनंदा निक्रड, सायली सुर्वे संध्या स्वामी सुनीता गायकवाड, कल्पना तळेकर इशिता गायकवाड, बाळासाहेब डफळ, अनघा दिवाकर सुनिता जुन्नरकर सुशील गायकवाड अनुषा पै रमेश सरदेसाई भरत शिंदे जयवंत सूर्यवंशी मोहिनी सूर्यवंशी डॉक्टर मृणाल फोंडेकर धनश्री चव्हाण ओम पाथरे शोम पाथरे आणि कामगार व कामगार कुटुंबीय या अभियानात सहभागी झाले होते.