Mahila Sanvad News in Jalna

खोतकरांना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील-सिमाताई

खोतकरांना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील-सिमाताई

खोतकरांना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील-सौ. सिमाताई खोतकर


जालना : महायुतीचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार श्री. अर्जुनराव खोतकर याना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील, महायुती सरकारने केवळ लाकडी बहिन योजनाच आणली नाही तर अनेक प्रकारच्या योजना जनतेसाठी ह्या सरकारने आणल्या असून भविष्यात देखील ते जनतेसाठीच काम करणारे सरकार असेल, असा विश्वास सिमाताई खोतकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्ष व महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार अर्जुन पंडितराव खोतकर यांच्या प्रचार्थ सौ. सिमाताई खोतकर व सौ. दर्शना खोतकर- झोल यांनी विविध ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रभाग क्रमांक 16 मधील श्री. राम मंदीर, बडी सडक, कालिकुर्ती, भक्कड वाडा, श्री. रामदेव बाबा गल्ली, श्री. हनुमान मंदीर, श्री. दुर्गा माता रोड, मिशन हॉस्पिटल, दांनकुवर शाळा, अहिर भवन, श्री. शनी मंदिर येथील स्थानिक नागरिकांची सौ. दर्शना खोतकर झोल यांनी भेट घेऊन डोअर टू डोअर प्रचार केला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनींचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलतांना सौ. खोतकर म्हणाल्या की, मेडीकल कॉलेस खरे तर यांनी आणले मात्र तो भामटा सांगतो आम्ही आणले, महानगर पालिकेचा संपूर्णपणे बट्ट्याबोळ केला आहे. अर्जुनराव खोतकर सत्तेवर आले तर संपूर्ण कारभार सुधाण्यात येईल. पाणी सुध्दा त्यांनी आणले मात्र हा भामटा स्वत:ला जलसम्राट म्हणून  घेत आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, राज्यातले रस्ते, आरोग्य सेवा, परिवहन सेवा, पाणी व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, शेतकर्‍यांचे शेती विषयक योजना, वयोवृध्द मंडळींना वयोश्री योजना, महिला साठी दरमहा पंधरा रुपये देणारी लाडकी बहिण योजना या सर्व योजना महायुती सरकारने राबविल्या आहेत. आघाडी काय केले? तर काहीच नाही. उलट पक्षी त्यांनी चालू असलेल्या चांगल्या योजना बंद करण्याचे पाप केले. उद्या ते जरी सत्तेवर आले तर हेच करणार आहेत. म्हणून महायुतीच्या म्हणजेच धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन शेवटी सौ. सिमाताई खोतकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *