Mahila Sanvad News in Jalna

विधानसभा निडणुक-2024 च्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधीतील राज्य उत्पादन शुल्क विभाग जालना विभागाने केलेली कारवाई…

विधानसभा निडणुक-2024 च्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधीतील राज्य उत्पादन शुल्क विभाग जालना विभागाने केलेली कारवाई…

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासुन (दि. १५/१०/२०२४ ते दि.. १७/११/२०२४ या कालावधीमध्ये) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकुण ४ पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये एकुण १७२ गुन्हे नोंदकेले असुन त्यात १५२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यात एकुण रु.३९,८१,९३५/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एकुण ८ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.

निवडणूक कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणवर अवैध मद्य वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी या विभागाने विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार वाहन तपासणी करणे, संशयीत ठिकाणांवर छापे टाकणे व रात्रीच्या वेळी गस्त घालणे अशी कारवाई करण्यात येत आहे. तसेच ढाब्यांवर होणाऱ्या अवैध मद्यविक्रीवर सुध्दा विभाग लक्ष ठेवून आहे..

तसेच कलम-९३ अंतर्गत सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणूकीबाबतचे बंधपत्र घेण्यासाठी संबंधीत प्रातांधिकारी यांना एकुण ६० प्रस्ताव सादर करण्यात असून त्यापैकी 11,00000/- किंमतीचे २२ बंधपत्र घेण्यात आले आहेत. निवडणूक कालावधीमध्ये सदर बंधपत्राचा भंग केल्यास संबंधीत गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

आचारसंहिता कालावधीमध्ये मद्यविक्री अनुज्ञप्त्या विहीत वेळेत उघडणे व बंद करणे यावर क्षेत्रीय अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. या नियमांचे उल्लघन करणाऱ्या अनुज्ञप्तींवर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचे निर्देश आहेत. अनुज्ञप्तीधारकांडून कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही व कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा कसे? याबाबत तपासणी करण्यासाठी सर्व निरीक्षक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात अनुज्ञप्तींचे सखोल निरीक्षणाच्या विशेष मोहिम राबविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *