जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ व पोलीस अधिक्षक बन्सलयांनी केली रामनगर येथील मतदान केंद्राची पाहणी
जालना,दि.19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधिक्षक अजयकुमार बसंल यांनी आज जालना विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राना मतदानाच्या पुर्व संध्येला भेट देवून पाहणी केली.
या वेळी डॉ. पांचाळ यांनी जालना विधानसभा मतदारसंघातील रामनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रास भेट दिली. तसेच मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान केंद्रावर कार्यवाही पार पाडण्याच्या यावेळी सूचना दिल्या.
यावेळी पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची उपस्थिती होती.