जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची आयोगाकडून नियुक्ती..
जालना,दि.19,(जिमाका): जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102-बदनापूर(अ.जा.) व 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान तर दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने पाचही विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले मतमोजणी निरीक्षक दि. 21 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित विधानसभा मतदारसंघात दाखल होणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 99-परतूर विधानसभा मतदारसंघाकरीता श्री.नवीन (भा.प्र.से.), 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघाकरीता राजीव शुक्ला (एस.सी.एस.), 101-जालना विधानसभा मतदारसंघाकरीता भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे डॉ. वेद पती मिश्र (भा.प्र.से.), 102-बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाकरीता राजीव रंजन (एस.सी.एस.), 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघाकरीता श्रीमती रिचा (एस.सी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. 99-परतूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबा-परतूर येथील पी.एम.श्री.जवाहर नवोदय विद्यालय, 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची घनसावंगी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 101-जालना विधानसभा मतदारसंघाची जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 102-बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाची बदनापूर येथील कृषि महाविद्यालयात आणि 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघाची भोकरदन येथील नगर परिषद मंगल कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. असेही कळविले आहे.