विधानसभा विधानसभा मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावरसार्वत्रिक निवडणूक-2024
विधानसभा मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
2019 च्या तुलनेत 2024 मध्ये 5.6 टक्यांनी मतदानात वाढ
जालना, दि. 21 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, दि. 20 नाव्हेंबर, 2024 रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या तुलनेत काल पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जालना जिल्ह्यात 5.6 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली असून, विधानसभा मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मध्ये 67.07 टक्के मतदान झाले होते. तर काल पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये 72.67 टक्के मतदान झाले आहे. यानुसार 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये 5.6 टक्क्यांनी मतदान वाढ झाली आहे. जालना जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात 70 टक्के तर 2 विधानसभा मतदारसंघात 75 टक्याहून अधिक मतदान झाले आहे.
काल पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या मतदानाच्या टक्केवारीत राज्यातील पश्चिमेकडील कोल्हापूर जिल्हा प्रथम तर पूर्वेकडील गडचिरोली जिल्हा दूसऱ्या क्रमांकावर तर राज्यातील मध्य भागातील जालना जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.