जालना विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी बबनराव लोणीकर विजयी उमेदवारजालना जिल्ह्यात भाजपाचे कुचे, लोणीकर शिवसेनेचे खोतकर विजयी
भोकरदनला संतोष दानवे यांची, घनसावंगी येथे हिकमत उढाण यांची आघाडी कायम
महिला संवाद:-
जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुती क्लिन स्विप मिळवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जालना मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी कॉंग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा, बदनापुरात भाजपाचे नारायण कुचे यांनी शरद पवार गटाच्या बबलू चौधरी यांचा तर परतूर येथे भाजपाचे बबनराव लोणीकर यांनी ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांचा पराभव केला आहे. तर घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी शरद पवार गटाचे राजेश टोपे यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकलेले आहे. भोकरदन मतदारसंघात भाजपाचे संतोष दानवे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.