103–भोकरदन विधानसभा मतदार संघातून दानवे संतोष रावसाहेब विजयी
जालना, (जिमाका)दि.23: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 103-भोकरदन मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील नगर परिषद मंगल कार्यालय, भोकरदन येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार दानवे संतोष रावसाहेब यांना 1,28,480 मते मिळाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पुंडलीकराव दानवे यांना 1,05,301 इतकी मते मिळाली. यात भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार दानवे संतोष रावसाहेब हे 23,179 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी दानवे संतोष रावसाहेब यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दयानंद जगताप, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बनकर, यांची उपस्थिती होती.
103-भोकरदन विधानसभा मतदारसंघातून एकुण 32 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते प्राप्त झाली आहेत.