जालना शहर महानगरपालिका, जालना.
” घर घर संविधान ”
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व नगर विकास विभाग यांच्या परिपत्रकान्वये. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव म्हणून साल सन 2024 -25 वर्ष “घर घर संविधान “म्हणून साजरा होणार आहे.
सदर कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून जालना शहर महापालिकेच्या वतीने जालना शहरातील सर्व कुटुंबांना संविधान उद्देशिका भेट देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे जालना शहरातील सर्व शासकीय कार्यालय सर्व सामाजिक संघटनेची कार्यालय सर्व राजकीय पक्षाची कार्यालय यांनाही संविधान उद्देशिका भेट म्हणून महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने 60 हजार संविधान उद्देशिका छापल्या आहेत.
सदर कार्यक्रमाची सुरुवात आज मा. जिल्हाधिकारी जालना यांना संविधान उद्देशिका ची फोटो फ्रेम भेट देऊन करण्यात आली. त्याचप्रमाणे इतर शासकीय कार्यालयात देखील आज संविधान उद्देशिका भेट देण्यात आल्या महानगरपालिकेच्या 140 अशा सेविका मार्फत देखील प्रत्येक कुटुंबाला उद्या आणि परवा संविधान उद्देशिका भेट म्हणून देण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी आपापल्या घरात संविधान उद्देशिका लावून त्याची नियमित वाचन करावे. करिता महापालिकेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
आज मा. जिल्हाधिकारी यांना संविधान उद्देशिका भेट देत्यावेळी मा.आयुक्त संतोष खांडेकर, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, इतर अधिकारी कर्मचारी हजर होते.