वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले…..
प्रतिनिधी महिला संवाद,
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची आठवण करणारा हा दिवस आहे . संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक घोषित केले आहे. हे भारतीय नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची हमी देते आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्न करते.
आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व भारतीय संविधानाची उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
पुणे शहर अध्यक्ष ॲड.अरविंद तायडे व जेष्ठ नेते वसंतदादा साळवे, प्रफुल्ल गुजर, सुरेखाताई गायकवाड, विवेक लोंढे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ॲड किरण कदम, सागर आल्हाट, विश्वास गदादे, बी पी सावळे, शाम गोरे, राजाभाऊ ढाले, जाॅर्ज मदनकर,जिवन रोकडे,बाळासाहेब बनसोडे, सतीश ननावरे,शुभम चव्हाण, संदीप चौधरी, मोहन गाडेकर ओंकार कांबळे यांच्या सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते