भारतीय संविधानाचे रक्षण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य डॉक्टर राजकुमार मस्के
भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून या संविधानामुळेच आपल्या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली असून सेक्युलर भारत निर्माण करण्यामध्ये भारतीय संविधानाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून काही समाज विघातक प्रवृत्ती भारतीय संविधानाला बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून या देशाचा नागरिक म्हणून आपण या संविधानाचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे असे समजावे असे मत जालना समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के यांनी संविधान दिन कार्यक्रमात व्यक्त केले.
जालना समाजकार्य महाविद्यालय रामनगर या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानावर पोस्टर स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
याच कार्यक्रमात महाविद्यालयाचे ॉक्टर दीपक बुक्तरे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कणकुटे यांनी भारतीय संविधान याचे रक्षण करणे आणि संविधानाबद्दल जनजागृती करणे याविषयी आपले मत मांडले, विचार मंचावर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री रमेश गजर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक राजू वाघमारे यांनी केले तर आभार योगेश खोसे यांनी केले.
यावेळी पियुशा आठवले, वैष्णवी भुतेकर, शुभांगी भुतेकर, योगेश पवार, अमृत शेळके आणि योगेश खोसे या विद्यार्थ्यांना पुरस्कार स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नरसिंग पवार, डॉ. रेणुका बडवणे, डॉ. सुधीर गायकवाड डॉ. मधु खोब्रागडे, डॉ, बालाजी मुंडे, डॉ. दीपक बुकतरे, आणि कार्यक्रमाचे संयोजक व कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण कनकुटे, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.