26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली म्हणून सदर बाजार पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पोलीस कर्मचाऱ्यांसह DYSP अनंत कुलकर्णी यांनी ही केले रक्तदान
26/11 रोजी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यातील शूर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी मागील पाच वर्षा पासून जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात 26/11 या दिवशी पोलीस प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दि. 27 बुधवार रोजी सकाळी 09 वा. पासून सदर बाजार पोलीस ठाण्यात इंडियन मेडिकल असोशियसन आणि HDFC बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जालना पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी म्हणून रक्त संकलन करण्याचे ठरवले असून उपविभागिय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
शहिदांच्या स्मृतीस ऊजाळा मिळण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात दरवर्षी 26/11 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात येते. सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शहिदांच्या स्मृतीला उजाळा द्यावा,दिवसेंदिवस रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून गरजूंना वेळेवर रक्त मिळण्यासाठी अशा प्रकारचे रक्तदान शिबिराची नितांत गरज असून आज च्या शिबिरामध्ये शंभर पेक्षा जास्त रक्तदाते रक्तदान करतील असा विश्वास जिल्हा पोलीस आधीक्षक अजय कुमार बंसल यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी रक्तदात्यांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस आधीक्षक अजय कुमार बंसल,उपविभागिय पोलीस आधिकारी अनंत कुलकर्णी, पो.निरि.संदिप भारती,पो.निरि. सम्राटसिंग राजपूत,पो.निरि.सुरेश ऊनवणे,पो.निरि.सिध्दार्थ माने यांच्या सह महाराष्ट्र राज्य ब्लड डोनेशन कमिटी चेअरमन डॉक्टर कैलास सचदेव तसेच एचडीएफसी बँकेचे पदाधिकारी व कर्मचारी ई. ची उपस्थिती होती.