जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मार्फत हृदयाला छिद्र असलेल्या जालन्याच्या शिवांश भोसले वर यशस्वी उपचार…
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शिवांश वर करण्यात आले उपचार…दीड वर्षापूर्वी हृदयाचे ऑपरेशन झालेला शीवांश आज ठणठणीत…
आज दिनांक 29 शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना हृदयाला छिद्र असलेल्या जालन्याच्या शिवांश भोसले वर यशस्वी उपचार करण्यात आलेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शिवांश वर मुंबई येथील रुग्णालयात यशसवी उपचार करण्यात आलेत. शिवांश च्या हृदयाला जन्मतः छिद्र होतं. दीड वर्षांपूर्वी शिवांश च्या हृदयाचं राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मोफत ऑपरेशन करण्यात आलं.
जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाने फार्मरिटी कंप्लीट करून शिवांश ला ऑपरेशन साठी मुंबई येथे पाठवलं होतं. आज शिवांश ने बरा झाल्यानंतर डॉक्टराला दाखवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आला होता.
दीड वर्षापूर्वी हृदयाचे ऑपरेशन झालेला शीवांश आज ठणठणीत बरा झालाय. शिवांश आज त्याच्या परिवारासह जालना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र भोसले यांच्या भेटीसाठी आला होता. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी डॉ. भोसले यांचे आभार मानले.