बँकेच्या कर्जाला कंटाळून एकाची आत्महत्या,संतप्त नागरीकांनी गोंदी पोलीस ठाण्यात मृतदेह सोडून निघून गेले
बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची संतप्त नातेवाईकांची मागणी
अंबड तालुक्यातील कृष्णा विनायक आमटे या 35 वर्षीय युवकाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अंकुश नगर येथील शाखा व्यवस्थापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
यावेळी संपूर्ण गावकरी आक्रमक होत सदर मृतदेह गोंदी पोलीस ठाणे येथे आणण्यात आलेला आहे.
जोपर्यंत शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे आक्रमक भूमिका नातेवाईकांसह करंजळा गावकऱ्यांनी घेतली आहे.
पोलीस स्टेशन परिसरात मोठा जमाव जमलेला असून संध्याकाळ पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी आज दिनांक आठ रविवार रोजी दुपारी दिड वाजल्यापासून सायंकाळी सहा वा. पर्यंत मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला होता.परंतू त्यानंतरही पोलीसांनी कारवाई न केल्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह गोंदी पोलीस ठाण्यात सोडून निघून गेलया आहे.
जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील बँक व्यवस्थापकाच्या जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. कृष्णा विनायक आमटे वय 35 वर्ष असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बँकेतून घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेतील अधिकारी मयत कृष्णा आमटे यांना वारंवार फोन करत होते असा आरोप करत बँक अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून कृष्णा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. अंकुशनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे बँक व्यवस्थापक आणि बँकेतील 2 कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केलीय. बँक व्यवस्थापकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मयत तरुणाचा मृतदेह घेऊन नातेवाईकांनी गोंदी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडलाय. या प्रकरणी जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कृष्णा आमटे यांचे नातेवाईक आणि करंजळा गावातील ग्रामस्थांनी घेतलीय.