निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन
जालना, दि.19(जिमाका) :- उद्योग संचालनालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत नि:शुल्क 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे दि.24 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कार्यालयाशी (02482 220592, मो.8087283065) संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.