राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचा समारोप
जालना, दि.19(जिमाका) :- पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व चंदनझिरा येथील जीवनराव पारे विद्यालयाच्या सहकार्याने दि.18 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय क्रीडा सप्ताह कार्यक्रमाचा समारोप दुपारी 3 वाजता जीवनराव पारे विद्यालयात पार पडला.
प्रारंभी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, रेखा परदेशी, सिध्दार्थ कदम, प्रा.हेमंत वर्मा, सुभाष पारे, अमर लोढें, निसार सय्य़द, प्रतिमा मसवले, विजय खांडीभराड, माधव भद्रे, राहूल गायके, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दि.12 ते 18 डिसेंबर 2024 या दरम्यान राष्ट्रीय क्रीडा सप्ताहानिमित्त जालना जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयामध्ये आयोजित विविध स्पर्धा व इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेवून यश संपादन केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्हाचे वितरण करण्यात आले. असेही जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.