जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर दरम्यान ‘सुशासन सप्ताह ..प्रशासन गाव की और’ साजरा होणार जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळजालना,
दि.18(जिमाका) :- जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत ‘सुशासन सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून, यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘प्रशासन गाव की और’ हा उपक्रम साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
सर्व विभागांमार्फत 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान सुशासन सप्ताहात केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच योजना गावपातळीवर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. यात नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन प्राप्त तक्रारींचा निपटारा केला जाईल. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, नगर पालिका प्रशासन व इतर विभागांमध्ये योग्य समन्वय ठेवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.