जालना,(जिमाका) दि. 22 :- मा. मुंबई उच्च न्यायालय तसेच खंडपीठ नागपुर व छत्रपती संभाजीनगर येथे दि. 30 नोव्हेंबर आणि दि. 01 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्यांची प्रकरणे मा.मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपुर व छत्रपती संभाजीनगर येथे प्रलंबित आहेत व ज्यांना त्यांची प्रकरणे तडजोडीने निकाली काढावयाची आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना…